


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : त्याग, बलिदान व कुर्बानी यांचे महत्त्व पटवून देणारा सण म्हणजे बकरी ईद. फक्त बकरी,पशुबळी देऊन किंवा अन्नदान करून नव्हे तर आपल्याजवळ असलेले सर्व प्रकारचे संसाधन समाजास उपलब्ध करून द्यावे,व मानवता प्रस्थापित करावीं.हेच बकरी ईदच्या सणाचा संदेश आहे.हा सण अधिकाधिक समाजाभिमुख व काल सुसंगत व्हावा म्हणून सांगली जिल्हा अल्पसंख्याक विकास मंच, मुस्लिम सत्यशोधक मंडळ व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने सोम दि.१७ जुन रोजी मिरज येथील वसंतदादा पाटील ब्लड सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले..समाजाला काही तरी देणे लागतो, तसेच रक्तदान केल्याने समाजात बंधुत्वाची भावना वाढीस लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांमधून रक्तदान करणे आवश्यक आहे.रक्तदानामुळे एखाद्या गरजूंना मदत होऊन त्यास जीवदान मिळू शकते.व त्यांच्याबरोबर रक्ताचे नाते, भावनिक संबंध तयार होऊ शकतात. म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र,रक्तदाता कार्ड व एक प्रबोधनपर पुस्तक संयोजकाकडून देण्यात आले.या शिबीराचे संयोजन वंचीत बहुजन आघाडीचे मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते हजरतअली सोनीकर, सांगली जिल्हा अल्पसंख्याक विकास मंचचे संघटक मुनीवर शिकलगार व वसंतदादा पाटील ब्लड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी युवराज मगदूम यांनी केले.तर यावेळी ब्लड बॅंकेच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली पोळ मॅडम,कॉग्रेसचे युवानेते चन्नय्या,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कदम,कार्तिक माटे, स्वप्नील जाधव,अग्रणी संस्थेचे संचालक कबीर कांबळे, राकेश तामगावे आदि मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त अशा प्रकारच्या समाजाभिमुख उपक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.














