Home महाराष्ट्र सातारा रहिमतपुर दासा हुंडे हल्याप्रकरणी आरोपींवर कारवाईसाठी पालक मंत्री शंभूराज देसाई यांना...

सातारा रहिमतपुर दासा हुंडे हल्याप्रकरणी आरोपींवर कारवाईसाठी पालक मंत्री शंभूराज देसाई यांना घेराव : वैभव गिते

429

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : रहीमतपुर ता. कोरेगाव जी. सातारा येथे दासा हुंडे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाल्याने रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
त्या अनुषंगाने आज सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत हे समजताच नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते व पदाधिकारी यांनी पालकमंत्री देसाई यांना घेराव घालत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दीले. तात्काळ दोन आरोपींना अटक करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
उपस्थित होते. वंचीत बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ खरात,अमोल गंगावणे, एन.डी.एम.जे संघटनेचे नवनाथ भागवत, जय माने, सुनील कांबळे, प्रणव भागवत, फिर्यादी बाळासाहेब हुंडे उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई,जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना भेटून 1 ते 29 कायदेशीर मुद्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचीत बहुजन आघाडी सातारा पदाधिकारी यांनी सहकार्य केले. दरम्यान नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने रहिमतपूर येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. घटनास्थळाचे पाहणी केली. फिर्यादी व साक्षीदार यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here