Home महाराष्ट्र बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वॉरियर्स चे प्रयत्न : देवयानी दिघे

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वॉरियर्स चे प्रयत्न : देवयानी दिघे

238

 

अहमदनगर –
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वॉरियर्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणारे प्रयत्न अतिशय स्तुत्य असून बालकांचे भविष्य घडण्यासाठी वॉरियर्स फाउंडेशन चे उपक्रम उपयुक्त आहेत. संस्कारक्षम वयातच भारतीय संस्कृतीचे संस्कार होणे महत्त्वाचे आहे* असे मत एम.बी. प्लेसमेंट च्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या देवयानी दिघे यांनी व्यक्त केले.
वॉरियर्स फाउंडेशन संचलित प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्या कॉटेज कॉर्नर येथे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला गोसावी या होत्या.
पुढे बोलताना देवयानी दिघे म्हणाल्या की, बाल वयात होणारे संस्कार अतिशय महत्त्वपूर्ण असून मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी हेच संस्कार पुढे उपयुक्त ठरत असतात. पालकांनी आपल्या बालकांना जवळच्याच नर्सरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यास बालकांना अधिक वेळ देता येईल. या परिसरातील बालकांची सोय वॉरियर्सच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्री प्रायमरी स्कूल मुळे होत असून येथे बालकांचे भविष्यही उज्वल होत आहे. विविध सण,उत्सव व राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करून बालकांना संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मृति घोडेस्वार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता गोसावी, स्मृती घोडेस्वार, वर्षा गुजर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here