Home महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सहसंघटकपदी ऋग्वेद येवले साकोलीत पत्रकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सहसंघटकपदी ऋग्वेद येवले साकोलीत पत्रकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

191

 

साकोली : जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सहसंघटकपदी शहरातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शहर अध्यक्ष तथा ‘युवाराष्ट्र दर्शन’ चे साकोली शहर प्रतिनिधी ऋग्वेद येवले यांची निवड ता. १७ मार्चला नागपूर येथे करण्यात आली. याप्रसंगी साकोलीसह भंडारा जिल्ह्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जागतिक मानवाधिकार संघटना नरवाडे ग्लोबल ह्युमन राइट्स असोसिएशन असून केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्र सरकार, सार्वजनिक तक्रार सीबीआय अँटी करप्शन, एमआरटीपी कमिशन भारत सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र महिला आयोग, महाराष्ट्र मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, ईडी, संयुक्त राष्ट्र परिषद यांच्याशी जोडलेली आहे. नागपुरात १७ मार्चला कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवाडे, राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटणाके, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके, सरचिटणीस विदर्भ प्रदीप शेंडे यांच्या उपस्थितीत साकोली येथील ऋग्वेद येवले यांची विदर्भ सहसंघटक पदी निवड करण्यात आली.
ऋग्वेद येवले यांची ही विदर्भ स्तरावर निवड झाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, दै. युवाराष्ट्र दर्शन जिल्हा प्रतिनिधी विलास सुदामे, पत्रकार सेवा संघ जिल्हा युवती अध्यक्षा रोहिणी रणदीवे, तालुका अध्यक्ष निलय झोडे, शहर सचिव किशोर बावणे, तालुका व शहर पदाधिकारी रवि भोंगाणे, साहिल रामटेके, कोषाध्यक्ष मनिषा काशिवार, शेखर ईसापुरे, दुर्गेश राऊत, यशवंत कापगते आणि “दै युवाराष्ट्र दर्शन” भंडारा जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींनी ऋग्वेद येवले यांचे या विदर्भस्तरीय निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here