Home महाराष्ट्र अखेर मिशन ग्राउंड गणेशपुर जनतेच्या हातून गेला पैशा समोर जनतेची हाक...

अखेर मिशन ग्राउंड गणेशपुर जनतेच्या हातून गेला पैशा समोर जनतेची हाक हरली मिशन ग्राउंडचे प्लॉट विकण्यास सज्ज

260

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986

भंडारा: येथील गणेशपुर मधील ब्रिटिश राजवटीपासून प्रसिद्ध असलेला मिशन ग्राउंडचे प्लॉट पाडून ते विकण्यास सज्ज करण्यात आले आहे. काही दिवसाअगोदर ट्रॅक्टरने मिशन ग्राउंड नांगरणे सुरू झाले. आणि इथे प्लॉट पडणार असल्याची बाब गणेशपुर जनतेच्या लक्षात येताच. जिल्हाधीकाऱ्यांना जनतेकडून निवेदन देवून मिशन ग्राउंड वाचविण्याकरिता प्लॉटिंगचे कामावर बंदी घालण्यात यावी व हे मैदान गणेशपुर जनतेला व इतर जनतेला , मुलांना खेळण्यासाठी वापरता यावे अशी मागणी करण्यात आली. हा विषय गंभीर होत गेला अधिकाऱ्यावर जनतेचा दबाव वाढत गेला आणि प्लॉटिंगचे काम काही महिने बंद पडले. जनतेने आनंदाचा श्वास सोडला. विद्यार्धी, वयोवृध्द, पोलिस भरतीचे विद्यार्थी यांनी पुन्हा मिशन ग्राउंड वर खेळण्यास सुरुवात केली. परंतु अखेर पुन्हा एकदा मोजमाप करून सिमेंटचे खांब मिशन ग्राउंड वर दिसू लागले. आता जनतेच्या डोळ्यासमोर मिशन ग्राउंडचे प्लॉट पाडून विकण्यास सज्ज केले आहे. शेवटी पैसा जिंकला आणि जनतेची हाक हरली असे चित्र निर्माण झाले.

______________________

गणेशपुरच्या व शहरातील लहान मोठ्या रहिवाशांना मिशन ग्राउंड खेळण्यासाठी एकमेव ग्राउंड होते. परंतु या ग्राउंडचे प्लॉट पाडून विकायला काढल्यामुळे आता जनतेला, विद्यार्थ्यांना, इतर पोलिस भरतीची मैदानी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे.
( गणेशपुर रहिवासी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here