Home महाराष्ट्र पिसाटलेल्या कुत्र्याची बंदोबस्ताची मागणी !…

पिसाटलेल्या कुत्र्याची बंदोबस्ताची मागणी !…

173

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पिसाटलेल्या कुत्र्यांनी मोठा हौदास घातला असुन शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी ह्या पिसाटलेला कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अश्या मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाचे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी साहेब यांना देण्यात आले.
सदर वृत्त असे की गेल्या महिनाभरात शहरात ह्या पिसाटलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला असून सामान्य जनतेत मोठी भिती निर्माण झाली आहे आज दुपारीच चार वाजता लहान माळी वाडा शेजारी नवेगावात आनंद पाटील यांचा पाच वर्षीय मुलास घरचा ओट्यावर खेळत असताना पिसाटलेल्या कुत्र्यांनी हाताला चावा घेऊन गंभीर दुखापत केली. घडलेला प्रकार पाहून परीसरातील असंख्य नागरीक भयभीत झाले वारंवार होत असलेल्या ह्या प्रकारा मुळे सामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असुन पालिका प्रशासन विषयी चिड व्यक्त होत आहे तरी सदर प्रकार नविन होऊ नये म्हणून पिसाटलेल्या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयान कडून होत आहे.
सदर निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार कडू महाजन,माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे,वाल्मीक पाटील,सिताराम मराठे,सुमित मराठे,दिलीप पाटील,आबा पाटील,जितेंद्र पाटील,हेमु चौधरी,पंकज पाटील, समाधान पाटील,समाधान चौधरी,गोकुळ पाटील,राज चौधरी,भुर्या धोबी,रिकु पाटील,विनोद पाटील,भैय्या चौधरी,योगराज महाजन,सोनु महाजन,योगेश मराठे,जितेंद्र महाजन, यशवंत चौधरी सह आदि चा सह्या आहेत
आपल्या मागण्याचा नक्कीच विचार करण्यात येईल.व सदर मागणी वरिष्ठ पर्यंत पोहचतो अशी हमी पालीका प्रशासनाचे अधिकारी पारधी साहेबानी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here