


वरूड तालुका प्रतिनिधी /
शेंदुरजनाघाट मलकापुर येथील गोरगरीब जनतेसाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी विशेष प्रयत्न करून अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आरोग्यसेवेकरीता विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय मंजूर करून १६ कोटी रुपयांची तरतूद करुन देण्यात आली असून सदर रुग्णालयाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले झाल्यामुळे शेघाट येथे ग्रामीण रूग्णालय मंजुर करून आणल्या बद्दल शेघाट येथील नागरीकांच्या वतीने आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
मोर्शी विधानसभा मतदार संघातील शेघाट येथे प्राथमीक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून नवीन इमारतीस मान्यता प्रदान करण्याबाबात मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून प्राधान्याने निधीची तरतूद करून देण्याची मागणी केली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शेघाट परिसरातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी शेघाट येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यास राज्य शासनाने “विशेष बाब’ म्हणून मान्यता दिली असून, इमारत बांधकाम व पदनिर्मिती संदर्भातील शासन आदेश जारी केला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली. वरुड मोर्शी तालुक्यातीलआरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी आमदार देवेंद्र भुयार प्रयत्न करतांना दिसत आहे.
ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पुरविण्याचे दृष्टीने सुविधा पाहीजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबतची पुर्व तयारी असणे काळाची गरज निर्माण झालेली आहे. सद्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची सोय फक्त प्राथमीक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणा-या उपकेंद्रावर अवलंबुन असल्यामुळे ग्रामीन भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
मोर्शी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार प्रयत्नशील असून त्यांनी शेघाट येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळवून दिली. मोर्शी वरुड तालुक्यातील योजनेच्या माध्यमातून विकसकामांकरिता निधीची तरतूद, करून मतदारसंघातील विकासकामांसाठी मंजूर करून आणणे यासह अनेक विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदार संघाच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी खेचत आणत असल्यामुळे मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असल्यामुळे शेघाट येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचा नगरी सत्कार करून त्यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.













