Home महाराष्ट्र माजी विद्यार्थी मुख्याध्यापक अशोक पवार यांची सुवर्णमहोत्सवी शाळेला सदिच्छा भेट !….. ...

माजी विद्यार्थी मुख्याध्यापक अशोक पवार यांची सुवर्णमहोत्सवी शाळेला सदिच्छा भेट !….. सन – १९८४ वर्ग १० वी ची बॅच लवकरच गेट टुगेदर करणार !…..

144

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे माजी विद्यार्थी तसेच जी.जे.वर्तक विद्यालय, वसई रोड, मुंबई चे मुख्याध्यापक अशोक पवार यांनी आपल्या शाळेची सदिच्छा भेट घेतली.
धरणगावला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता माझी शाळा महात्मा फुले हायस्कूल याला भेट द्यावी अशी मनापासून इच्छा होती आज रोजी अशोक पवार यांनी आपल्या शाळेला भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांच्याशी हितगुज साधून विस्तृत अशी चर्चा केली. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी माजी विद्यार्थी अशोक पवार व केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी गुरुजी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. १९८४ चा दहावीच्या बॅचमेटचा प्रतिनिधी म्हणून मी आज शाळेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे. आमचे आमच्या शाळेवर असलेले प्रेम आणि या शाळेमुळेच आम्ही अधिकारी झालो, घडलो आज शाळेला भेट दिल्याने मनस्वी आनंद झाला असे प्रतिपादन पवार यांनी केले.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार,पर्यवेक्षक एम बी मोरे, उपशिक्षक पी डी पाटील यांनी अशोक पवार यांना संपूर्ण शाळेचा परिसर दाखविला शाळेच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली. आम्ही नक्कीच १९८४ चे बॅचमेंट एकत्रित येऊन गेट-टुगेदर करण्याचा मानस आहे. आपल्या शाळेसाठी नक्कीच पुढच्या शैक्षणिक वर्षापासून आमच्या बॅचला शाळा डिजिटल करण्यासाठी जे शक्य असेल ते आम्ही आमच्या शाळेसाठी नक्की करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी विद्यार्थी अशोक पवार यांनी शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधला याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here