


बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
मुख्य हायवे रस्ता लगत असणाऱ्या कारी फाटा ते भोगलवाडी या रहदारीच्या रस्त्याचे तीन तेरा वाजलेले असुन वाहनधारकासह प्रवाशांचे या रस्त्याच्या दयनिय अवस्थेमुळे बे हाल होताना दिसत आहेत तरी या रस्त्याचे काम त्वरित लवकर सुरू करावे असे प्रसिध्दी पत्रकामध्ये युवा नेते श्री महेश मुंडे यांणी दिले आहे
प्राप्त माहिती नुसार पत्रकामध्ये नमुद केले आहे की कारी ते भोगलवाडी रस्त्यावरील तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जाणार असुन रस्ता मात्र नंतर केला जाणार असल्याची खात्रीशिल माहिती समोर आलेली आहे पण खड्डे बुजविल्यास सहा महिने सार्वजनिक रस्ते विभाग रस्ता करण्यास मान्यता देत नाही जर तात्पुरते स्वरूपात खड्डे बुजविण्यास सुरुवात केली तर रस्त्यावर उतरून आम्ही खड्डे बुजविण्यास विरोध करू व काम बंद पाडु असे महेश मुंडे यांनी म्हटले आहे गेल्या दोन वर्षा पासुन रस्ता खराब झालेला आहे रस्ते विभागाला अनेक निवेदने दिली आंदोलन केले पण दक्षता घेतली जात नाही वर्षाला भरणारी गावची यात्रा जवळ आलेली आहे गावच्या रस्त्यामुळे गावची इज्जत वेशीला टांगली जाऊ शकते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बेहाल होऊ शकतात वाहाने खिळखिळा झालेली आहेत पण सार्वजनिक विभाग मुग गिळुन गप्प असुन आज रस्ता होणार उद्या होणार म्हणुन गावाला झुल्वत ठेवत आहेत
जर रस्ता करावयाचा असेल तर संपूर्ण डांबरीकरण करा नुसते खड्डे साफ सफाई करून मलमपट्टी करून शासणाचा मलिदा स्वःताच्या फायदयासाठी वापरू नका त्यामध्ये रस्ता रूंदीकरण साईड पट्या रस्त्याला अतिक्रमणाच्या विळख्यातुन बाहेर काढा व रस्ता तात्काळ चालु करा असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये युवा नेते मा श्री महेश मुंडे यांनी म्हटले आहे














