


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य व रुबाबदार व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्री उदयनराजे भोसले व फलटणचे राजे रामराजे नाईक निंबाळकर यांची आज सायंकाळी फलटण येथील लक्ष्मी विलास निवासस्थानी भेट झाली. या भेटीमध्ये एकमेकांना सन्मानाने मुजरा करून राजकीय अनुकूलता दर्शवल्याचे पाहण्यास मिळाले. पश्चिम महाराष्ट्रातील विशेषता सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये राजकीय तुफान फटकेबाजी करणारे जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि सातारच्या छत्रपती गादीचे थेट वंशज भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय मतभेद अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. परंतु, महायुतीच्या माध्यमातून आता सर्वजण एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमधला विरोध कमी झालेला आहे.
फलटण नगरीमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर ,आ. जयकुमार गोरे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर श्री छ उदयनराजे भोसले यांनी थेट फलटण येथील रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळेला अनेक मान्यवर कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
हा धागा पकडून रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, श्री छ उदयनराजे भोसले हे हसले की पोटात गोळा उठतो व ते रागावले की बरे वाटते. या त्यांच्या वक्तव्याला चांगली दाद देण्यात आली. तत्पूर्वी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक राजकीय विश्लेषण करून राजकारणातील डावपेच बाबत राजकारण कसे असते? याचे विनोदी शैलीने मांडणी केली.
यावेळी सुनील काटकर, राजेंद्र यादव, संग्राम बर्गे, प्रवीण धसके, अमोल तागडे, काका धुमाळ, धनंजय पाटील, कल्याण राक्षे, चिन्मय कुलकर्णी, दादासाहेब चोरमले व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.














