


रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- दि 3 जानेवारी 2024 रोजी मा.राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र चे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब तसेच ओबीसी प्रदेश अध्यक्ष कल्याणजी(काकासाहेब ) आखाडे, ओबीसी समन्वयक ईश्वरजी बाळबुद्धे, माझी खासदार आनंद परांजपे, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे साहेब, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण, वैभवदादा आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नितीन भाऊ भटारकर यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील देवगिरी (उपमुख्यमंत्री निवास्थानी) अविनाश आनंदराव राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या माध्यमातून ओबीसी जनतेला न्याय देण्याची भूमिका मनात ठेवूनच काम करणार, पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्नरत असणार, शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जोपासूनच “जागर संविधानाचा ओबीसीच्या न्याय हक्काचा” लढा उभारण्यासाठी अविरत तत्पर असणार या निमित्ताने अशी ग्वाही अविनाश राऊत यांनी दिली. सर्व मान्यवर नेत्यांचे, सर्वच सहकाऱ्यांचे जाहीर आभार राऊत यांनी केले.
सदर निवडीबद्दल दामोदरजी मिसार साहेब जेष्ठ नेते रांकापा, नितीनजी भटारकर जिल्हाध्यक्ष रांकापा, राजीव कक्कड जिल्हाध्यक्ष चंद्रपूर महानगर रांकापा,आबीद अली प्रदेश सहसचिव,राकेश सोमाणी जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी, प्रशांत झामरे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय, रंजनाताई पारशीवे महिला जिल्हाध्यक्ष,सुजित उपरे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष,सुनीलभाऊ काळे विधानसभा अध्यक्ष चंद्रपूर, विलासभाऊ नेरकर विधानसभा अध्यक्ष वरोरा, अरविंदभाऊ रेवतकर विधानसभा अध्यक्ष चिमूर, शरदभाऊ जोगी विधानसभा अध्यक्ष राजुरा,किशोरभाऊ भोयर जिल्हा उपाध्यक्ष, महेंद्रसिंग चंदेल नगरसेवक /संचालक गोंडपिपरी, रमेशभाऊ करारे जिल्हा सचिव,सर्व तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नवघडे, संतोषभाऊ देरकर, महादेवभाऊ देवतळे, दामोदर नन्नावार, विजय ढोंगे, योगेश ठुणे, नोगेशजी बगमारे, घनश्यामजी राऊत, मंगेशभाऊ पोटवार तसेच सर्वच शहर अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हातील जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.















