Home महाराष्ट्र बामसेफ चे सुवर्ण जयंती राष्ट्रीय अधिवेशन प्रयागराज येथे…

बामसेफ चे सुवर्ण जयंती राष्ट्रीय अधिवेशन प्रयागराज येथे…

230

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : बामसेफ या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेला यावर्षी पन्नास वर्षे होत असून या सुवर्ण जयंती वर्षात संघटनेचे चाळीसावे राष्ट्रीय अधिवेशन प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे 24ते 27 डिसेंबर दरम्यान संपन्न होत असल्याची माहिती बामसेफ चे जिल्हाध्यक्ष मा सुशांत गायकवाड व जिल्हा महासचिव मा संभाजी सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

चार दिवस चालणाऱ्या अधिवेशनास किसान युनियन चे राकेश टिकैत, छत्तीसगढ चे निवृत्त आयपीएस संत कुमार पासवान व हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव आर आर फुलिया विशेष अतिथी म्हणून लाभले असून बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर हे अध्यक्षस्थनी असणार आहेत.

अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मूळनिवासी ओळख, नारी शक्ती वंदन निमित्ताने महिलांची फसवणूक, ओबीसी नेत्यांची संविधान विरोधकांसोबत हातमिळवणी, मूळनिवासी बहुजनांच्या ध्रुवीकरणाच्या भीतीपोटी एक देश एक निवडणूक इत्यादी विषयांवर सहा प्रबोधन सत्रे, सहा प्रतिनिधी सत्रे व उद्घाटन आणि समारोपीय सत्रामध्ये चर्चा होणार आहे.
यावेळी प बंगाल चे प्रा.डॉ.मो अफसर अली, प्रा.डॉ.हरेराम कुशवाहा, कविता मडावी, हरियाणा ओबीसी कल्याण महासभेचे अध्यक्ष प्रा आर सी लिंबा, डॉ सत्याजी राव, डॉ पी कोमला, दुबईहून आशिष जीवने, प्रा जी एस कश्यप, जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे अशोक बसोत्रा, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे प्रा डॉ राहुल राज, सावित्रीमाई गर्ल्स कॉलेज हरियाणाचे प्रा राजवीर सिंह, कुरुक्षेत्र विश्व विद्यालयाच्या डॉ निर्मला चौधरी, पंजाब फिलौर कोर्टाचे चरणजीत पुआरी, बिहार चे लोकप्रिय साहित्यिक डॉ शांती यादव, पतियाळा चे सरबजीत कौर, दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता ज्ञानमित्रा व अभिषेक चौहान,इंदोर चे डॉ रमा पांचाळ, प्रा.डॉ प्रभाकर निसर्गंध, हिंदू कॉलेज मोरदाबादचे प्रा रमाकांत ठाकूर, जामिया मिलिया चे प्रा वीरेंद्र सहारे, भटिंडा चे डॉ विनोद आर्या, कुशिनगर चे इतिहासकार डॉ सुभाष कुशवाहा, हैद्राबाद उच्च न्यायालयाचे कद्रे कृष्णा, ब
इत्यादी मान्यवर मार्गदर्शन व सहभागी होणार आहेत.
यावेळी विवीध सत्रांच्या अध्यक्षस्थानी शत्रूजीत सिंह, एन गंगाधर, सुरेश द्रविड, प्रा डॉ संजय इंगोले, आर एल ध्रुव, सुनीता कपरवाल, आर एस राम, मनोज कुमार, राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते हे करुन संस्थायीकरणाची प्रचिती देणार आहेत.
अधिवेशनामध्ये मूळनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ, मूळनिवासी सभ्यता संघ, मूळनिवासी संघ, मूळनिवासी विद्यार्थी संघ, डी के के एम टी, मूळनिवासी संघटक, एम एन टी न्यूज नेटवर्क, रिसर्च विंग, इत्यादी सहभागी होणार आहेत.
भारतासह जगभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून महाराष्ट्र तसेच सातारा
जिल्ह्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here