Home महाराष्ट्र रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टीमला सुवर्णपदक !… महाराष्ट्राच्या विजयी...

रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टीमला सुवर्णपदक !… महाराष्ट्राच्या विजयी संघामध्ये मांदुर्णेची सुकन्या कु.मानसी पाटील ( गोलकिपर ) चाही समावेश !…

192

 

चाळीसगांव प्रतिनिधी – प्रा.पंकज पाटील

चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे गावातील प्रगतिशील शेतकरी श्री.वसंतराव नारायण पाटील यांची नात व कै.विनायक वसंतराव पाटील यांची सुकन्या कु.मानसी विनायक पाटील हिची इंडियन ओलंपिक असोसिएशन द्वारा आयोजित गोवा येथे सुरू झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रोल बॉल स्केटिंग खेळात गोलकीपर म्हणून महाराष्ट्र राज्य संघाकडून प्रतिनिधित्व करीत होती. आज रोल बॉल स्केटिंग च्या अंतिम सामन्यामध्ये महिला संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करत राजस्थानचे ३ गोल व महाराष्ट्राने ४ गोल करून विजयी सुवर्णपदक मिळवले. कु.मानसी पाटील हीने गोलकीपर म्हणून महाराष्ट्राच्या संघामध्ये प्रतिनिधित्व केले. उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले
कु. मानसी विनायक पाटील ही अभियांत्रिकी BE Civil 2nd year भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज नाशिक येथे शिकत आहे.कु.मानसीने ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मांदुर्णे या छोटेसे गावाचे नाव तिने उंचावले आहे. याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here