Home चंद्रपूर राज्यघटना बदलविण्याचे सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र – डॉ.सतिश वारजूरकर जनकापूर येथिल बौध्द भिख्खू...

राज्यघटना बदलविण्याचे सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र – डॉ.सतिश वारजूरकर जनकापूर येथिल बौध्द भिख्खू वर्षावासानिमित्य कार्यक्रमांत प्रतिपादन

153

 

संजय बागडे 9689865954
नागभीड:-स्वातंत्र्य,समता, बंधुता, या मुलमंत्रावर आधारीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. मात्र या देशातील मनुवादी सत्ताधारी राज्यघटना बदलविण्याचे षडयंत्र रचत असुन हा त्यांचा हेतु आपन कधीही साध्य होवू देणारं नाही. तेव्हा सर्वानी या मनुवादी सत्ताधाऱ्यांना त्याची जागा दाखविण्याची वेळ आलेली आहे. असे प्रतिपादन डॉ. सतिश वारजूरकर यांनी केले. नागभिड तालुक्यातील जनकापूर येथिल बौध्द समाज,व रमाई महिला मंडळ यांचें संयुक्त विद्यमाने “बौध्द भिख्खू वर्षावासानिमित्य” आयोजित भिमगिताच निळ वादळं या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतं होतें. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंगेश फुलझेले, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका यु.काॅ अध्यक्ष रोशन ढोक, माजी नगरसेवक प्रतीक भसीन, आशिष भाकरे, पि.डि. काटकर, सरपंच वैशाली गायधने, उपाध्यक्ष देवता सुर्यवंशी, उपसरपंच महेशं रामटेके, ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम बारसागडे, शुभांगी डाहारे, शारदा सुर्यवंशी, लक्ष्मी मसराम,पोलिस पाटील प्रितम मेश्राम, शुभम ठिकरे, राकेश काशिवार, प्रा. नरेंद्र मेश्राम, प्रा.प्रमोद बोरकर, ज्ञानेश्वर पडोळे, नरेश बोरकर, ब्रम्हदास शेन्डे, बेबीताई बोरकर,शंकर भानारकर, प्रशांत खोब्रागडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेली जनकापूर येथिल स्नेहा मेश्राम हिचा मान्यवर मंडळी उपस्थित शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर मंडळांचे वतीने सतिश वारजूरकर, तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंगेश फुलझेले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी स्पर्धकांना मान्यवरांचे उपस्थित रोख पुरस्कार व नोटबुक वितरण करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल रामटेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरविंद चदंनखेडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आशिष गणवीर, पंकज रामटेके, कपिल बारसागडे, मिथून बोरकर, रोशन मेश्राम, चंद्रशेखर अलोने, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here