Home महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचे यश

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचे यश

135

 

कराड : (दि. ८, प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेज कराड मधील विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा संजय जाधव (बी.ए.भाग 1) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  राज्यभरातून विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. सदर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कु. प्रतिक्षा संजय जाधव हिने ‘समाज माध्यमाचे आभासी जग’ या विषयावर वैचारिक निबंध लिहिला होता. तिला या स्पर्धेत सहभागासाठी प्रा. सौ. एस.पी. पाटील, प्रा. पी. एस. चोपडे यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे  जनरल सेक्रेटरी श्री. अल्ताफहुसेन  मुल्लासाहेब,  संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री. अरुण पाटील (काका), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here