Home महाराष्ट्र चांद्रयान -3 मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनपर रॅलीने दुमदुमली औदुंबर नगरी

चांद्रयान -3 मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनपर रॅलीने दुमदुमली औदुंबर नगरी

113

(विविध सामाजिक संघटनांचा सहभाग)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 27 ऑगस्ट):- इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान -3 मोहिम यशस्वी केल्यामुळे भारतियांची मान अभिमानाने संपूर्ण जगात उंचावली आहे.

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल मोहिमेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांच्या प्रोत्साहनपर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतिने दि. 27ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता स्थानिक नगर पालिका प्रांगणातून सुवर्णपथ मार्गाने तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

रोटरी क्लबचे कैलास उदावंत अध्यक्ष डॉ धनंजय व्यवहारे यांच्या आवाहनानुसार आयोजित करण्यात आले या रॅलीत विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

यामध्ये इंजिनियर संघटनेचे सुरेन्द्र कोडगिरवार, दत्ता गंगासागर, औदुंबर वृक्ष संवर्धन समिती अशोक शिरफूले, नैसर्गिक पर्यावरण मित्र व संवर्धनचे जमिर खतीब, मैत्री ब्लड गृप फाउंडेशनचे अभिषेक ठाकूर, रुपाळेश्वर संस्थानचे प्रफूल्ल कोमलवार, जिव्हाळा गृपचे अतुल मादावार,भाविक भगत हेल्थ फाऊंडेशन, आदर्श बहुउदेशिय संघटनेचे शेवंतराव गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या सरोज देशमुख , तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष निळकंठ धोबे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय आडे,इनरव्हिल क्लब , डॉक्टर असोसिएशन, असामान्य ऑक्सिजन बँक, मोक्षधाम सेवा समिती , पतंजली समितीचे अॅड विलासराव देवसरकर, जेष्ठ नागरिक संघटना आदि सामाजिक संघटना रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

हातात तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत ‘भारतिय शास्त्रज्ञांचा विजय असो घोषणांनी शहर वाशियांचे लक्ष वेधले होते.

शहरातील चौभारा चौकातील गणेश मंदीराजवळ रॅली येताच रिद्धी सिद्धी गणेश मंडळाच्या वतिने किशोर तिवारी यांनी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना निंबु शरबत वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here