


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.13ऑगस्ट):-ब्रॕड वर्तमानपञ व छोटे वर्तमानपञ असा भेदभाव करून जाहिरात न देणाऱ्या लोकप्रतिनिधी यांच्या बातम्या प्रकाशित न करण्याचा निर्धार शहरातील पञकारानी एकमुखी घेतला आसून केवळ बातम्या पुरते पञकाराचा वापर करून घेणाऱ्या राजकीय नेत्याना यापुढे प्रसिद्धी न देण्याचा निर्धार ही घेण्यात आला.
लोकप्रतिनीधी असो की राजकीय नेते यांनी एक इंच केल्याचा कामाची बातमी हातभर देत बातमी प्रकाशित करण्यास पञकाराना सतत सांगत आसतात अखेर यांच्या कडून जाहिरात मिळेल ह्याच अपेक्षेने पञकार बातमी प्रकाशित करतात.गंगाखेड लोकप्रतिनिधी यांनी ही त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचा वेळोवेळी बातम्या प्रकाशित केल्या.वर्षभरात असंख्य बातम्या प्रकाशित केल्या केवळ जाहिरात मिळेल याच अपेक्षेने पण अपेक्षा फोल ठरल्या निमित्त होते वाढदिवसाचे यावेळी ब्रॕड वर्तमानपञ व छोटे वर्तमानपञ असाच भेदभाव करण्यात आला.
अनेक पञकारानी लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली आसता कार्यकर्त्याकडून जाहिरात घेण्याचा सल्ला दिला आसता गत वर्षीच्या जाहिरातचे बील कार्यकर्त्याकडे थकीत आसल्याचेही सांगण्यात आले.वर्षभर प्रसिद्धी देउन ही वर्तमानपञाचे वर्गीकरण करण्यात आले.सा.जनाई नगरी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत पञकार भागवत जलाले, भिमराव कांबळे, एम.बी.भिसे,शिवाजी कांबळे, मोसिन खाॕन,अली चाऊस, राजेश कांबळे, तुषार उपाध्याय, बालासाहेब कदम, अंकूश कांबळे, देवानंद गुंडाळे, राहुल साबने, गुणवंत कांबळे, सदाम शेख, अनील साळवे, बालासाहेब जंगले, शेख महेमुद, यांच्या उपस्थिती झालेल्या चर्चेत अखेर लोकप्रतिनिधी यांच्या बातम्यावर निर्बध घालण्याचा निर्धार घेण्यात आला.तर प्रसिद्धी पुरते पञकाराना जवळ करणाऱ्या राजकीय नेत्याना ही यापुढे प्रसिद्धी न देण्याचा निर्धार घेण्यात आला.














