


🔸सशक्त आंगनवाडी निरोगी समाज अभियाना अंतर्गत मागणी
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 4 ऑगस्ट ):-राज्यात कुपोषण (Malnutrition) आणि रक्ताची कमतरता ( Anemia )ही गंभीर समस्या आहे. भारत सरकारच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 नुसार महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक बालके आणि महिलां एनिमियाने ग्रस्त आहेत.कुपोषण आणि अशक्तपणा यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंगणवाडीची एक विशेष भूमिका आहे .
महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण सेवा पुरविणारे आंगनवाड्या हे एक महत्वाचे सार्वजनिक केन्द्र म्हणून काम करते हे सर्वज्ञात आहे.मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर या जन अधिकारासाठी कार्यरत सामाजिक संघटनेतर्फे राज्यव्यापी अभियान सशक्त अंगणवाडी निरोगी समाज राबविण्यात आले.या अभियानांतर्गत निष्कर्षात आलेल्या दोन मागण्या उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाव्दारे करण्यात आल्या.
महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण सेवा पुरविणारे आंगनवाड्या हे एक महत्वाचे सार्वजनिक केन्द्र म्हणून काम करते हे सर्वज्ञात आहे.परंतु आपल्या राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे नाहीत , ही खेदाची बाब आहे. पुरेशा संख्येने अंगणवाडी केंद्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक त्याच्या लाभापासून वंचित राहतात.
या व्यतिरिक्त महाराष्ट्रात मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली कुपोषण आणि एनिमियाच्या बळी पडल्या आहेत, ज्यांना अंगणवाडीव्दारे पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे.
परंतु अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या किशोरवयीन मुलींना पोषक आहार पोषणाचा अभाव, या मुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो.
आणि कुपोषणाचे हे चक्र तिच्या भविष्यातील आरोग्य, उत्पादकता आणि कालखंडाच्या विकासाला आधार देण्यात मूलभूत भूमिका बजावते.त्यामुळे
1 -राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे स्थापन करून त्याच्या सेवा सर्वांसाठी उपलब्ध कराव्या
2 – किशोरवयीन मुलींना नियमितपणे पुरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करावी.अशी मागणी एमपीजे तर्फे देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदन देतांना फिरोज अन्सारी जिल्हाध्यक्, हाफीज अन्सार हुसैनी, डॉ. फारूक अबरार कार्याध्यक्ष, रेखाताई गायकवाड सचीव , वसीम रसुल, शाहीस्ता खान, तसलीम अहेमद, मुजाहीद खान आदी कार्यकर्ते हजर होते.














