


✒️किशोर राऊत(महागाव,विशेष प्रतिनिधी)
महागाव(दि.3ऑगस्ट):- देशातील ग्रामीण भागामध्ये शिक्षणासह आरोग्य या विषयीचा अभाव असल्यामूळे ग्रामीण भागात कुठल्याही सुविधा नसल्याने आरोग्य व आजार याबद्दल जागृती व्हावी यासाठी आरोग्य शिबीराची अत्यंत गरज असल्याची प्रतिपादन ममता राठोड यांनी केले आहे. दैनंदिनच्या काळावेळात होत असलेले अनेक बदल जनतेवर प्रतिकुल परिणाम करतात त्यामधून अनेक आजाराने तोंड वर काढलेले असते आरोग्य सुदृढ राहण्यासाठी शरीर सक्षम बनवण्यासाठी व आरोग्याविषयी ग्रामीण भागात जनतेपर्यंत जाण्याविषयी आरोग्य शिबीराची गरज आहे.
ग्रामीण भागात वातावरणातील बदल व त्यातून होणारे आजार उदभवू नये, यासाठी गरज असून आरोग्य शिबीरातुन आजारांसह औषधि व त्यांचे दुष्परिणाम अशा विविध आजारातुन मुक्तता व आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मौजा घाणमुख येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात अनेक आजारावर प्रभावी उपचार करण्याची गरज असल्याचे ममता राठोड यांनी सांगितले.
ममता राठोड (आप संयोजिका) यांनी स्मॉल फाइनेंस उमरखेड यांच्याशी संपर्क साधून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागांसह संपूर्ण जनतेमध्ये जागृति करण्यासाठी तपशिलवार माहिती सांगितली. शिबीरासाठी घाणमुख येथील गावकर्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या शिबीरात ममता राठोड, काळुराम जाधव, प्रविण राठोड, ब्रिजलाल राठोड, अंकुश देशमुख, मनोज राठोड आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














