Home महाराष्ट्र यवतमाळ शहरामध्ये संभाजी भिडे दाखल न होऊ म्हणून संपूर्ण आंबेडकरी जनता रणांगणात...

यवतमाळ शहरामध्ये संभाजी भिडे दाखल न होऊ म्हणून संपूर्ण आंबेडकरी जनता रणांगणात उतरली

180

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ (दि. 30 जुलै)येथे मनोहर उर्फ संभा भिडे (कुलकर्णी) याचा बैठक होती. हि बैठक यवतमाळ मध्ये होऊ नये.कारण भिडे याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य केले व महात्मा गांधी यांच्या आईला मुस्लिम ने पळून नेले, स्त्रिया बद्दल वक्तव्य करतो आणि राष्ट्रीय ध्वज ला मानत नाही असे चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम हे भिडे करत.त्यामुळे मनुवादी भिडे चे संपूर्ण बॅनर फाडलेले आहे.व ती कामगिरी करत असताना यवतमाळ पोलिसांनीपॅंथर राज सोनवणे, सचिन खाडे बंटी पाटील, रुपेश लोखंडे व अभिषेक गायकवाड यांना अटक केली होती. अशी माहिती पॅंथर राज सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

या साठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी निषेध करत असनाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने अटक केली होती.यामध्ये प्रमोदिनीताई रामटेके, संगीताताई पवार, आशिष खंतडे, अभी गायकवाड,अजय शेंडे, विजय धुळे, आकाश वानी, वासुदेव महल्ले व इतर समाज बांधव आणि वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते अनेक यांना अटक करून वडगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here