Home महाराष्ट्र पुसद येथे 24 वा कारगिल दिवस साजरा

पुसद येथे 24 वा कारगिल दिवस साजरा

261

🔸माजी सैनिक यांच्या वतीने शहीद सैनिकांना मानवंदना

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27जुलै):-कारगिल विजय दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कारगिल युद्धामध्ये जे सैनिक शहीद झाले त्या शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी भारतामध्ये 26 जुलै हा दिवस *कारगिल विजय दिवस* म्हणून साजरा करण्यात येतो.

या दिवसाच्या सन्मानार्थ 24 वा *कारगिल विजय दिवस* पुसद तहसील येथील जय स्तंभ चौक येथे माजी सैनिक यांच्यावतीने मानवंदना देऊन साजरा करण्यात आला.यावेळी प्रामुख्याने उपस्थित पुसद तहसीलदार महादेव जोरावर साहेब,तहसीलदार पल्लवि आखरे मॅडम, यांच्या हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,पुसद तहसीलदार महादेव जोरावर, तहसीलदार पल्लवी आखरे,माजी सैनिक प्रकाश भोसले, माजी सैनिक, आलमगीर खान, भारत कांबळे, अब्दुल वहाब,ए.के गवई, बी आर जाधव ए एम राठोड सय्यद आयुब, शेख चांद, मिलिंद खंडाईत, प्रकाश पानपट्टे ,विक्रांत गायकवाड ,रामदास सावळे ,आर.बी चव्हाण ,आर डी जाधव, आर.एम .राठोड, इत्यादी माजी सैनिक,तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून एड, तहसीन अहमद, पत्रकार बाबाराव उबाळे, राजेश ढोले, अमोल वडगिरे, विजय निखाते, सुनील चव्हाण, अविनाश राठोड, गणेश जामकर, बालाजी कामिनवार, अतिश धोबे, डॉ. पंकज बासरवार, सुनिता तग्गलपल्लेवार, अनिता रेवणवार, मंदाकिनी डुबेवार, अरुणा जाधव, अनुश्री पुरी, सुनिता करमळकर, सीमा पापीनवार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here