Home महाराष्ट्र मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकासासाठी ७२ कोटी निधीची तरतूद – आमदार देवेंद्र...

मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकासासाठी ७२ कोटी निधीची तरतूद – आमदार देवेंद्र भुयार

171

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.22जुलै):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी ना. अजित दादा पवार यांची निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा मोर्शी वरूड तालुक्याला मिळणाऱ्या निधीचा ओघ पूर्वीप्रमाणे सुरू झाला असून त्याची प्रचिती जुलै 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघातील विवीध विकास कामांसाठी व ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने या रस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवाजि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये मतदार संघातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या व इतर विकासासाठी ७२ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आमदार देवेंद्र भुयार पुढे म्हणाले की मोर्शी वरूड तालुक्यांतील तहसील कार्यालय, शासकीय कर्मचारी निवासस्थान बांधकाम कारणे व विवीध गावांना जोडणारे महत्त्वपूर्ण रस्त्यांची परिस्थितीत अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे अश्या रस्त्यांकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून देण्याची मागणी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असता त्यांनी तहसिल कार्यालय मोर्शी, येथे शासकीय कर्मचारी निवासस्थान बांधकाम कारणे ११ कोटी ३५ लक्ष १९ हजार रु. तहसील कार्यालय वरुड येथे शासकीय कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे १३ कोटी ५५ लक्ष ३९ हजार रु. मोर्शी येथे तहसिल कार्यालय बांधकाम कारणे १२ कोटी ४३ लक्ष ५८ हजार रु. धानोडी शे. घाट मलकापूर वाई खुर्द रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष रु. वाडेगाव काटी लोणी रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी रु. राजुरा बाजार मोरचुद पवनी देऊतवाडा घोराड ढगा एकदरा पोरगव्हाण आमनेर रस्त्याची सुधारणा करणे व लहान पुलाचे बांधकाम करणे ५ कोटी रु. हिवरखेड ममदापुर लोणी हातुर्णा रस्त्याची सुधारणा करणे व स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे ३ कोटी रु. बारगाव ते जामगाव रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष रु. बारगाव ते जामगाव रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे १ कोटी २० लक्ष रु. बेनोडा ते पळसोना रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे २ कोटी २० लक्ष रु. बेनोडा ते धामनधस रस्त्याची मोन्यासह सुधारणा करणे ३ कोटी रु. प्रजिमा ४७ ते नवीन देऊतवाडा रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे ८० लक्ष रु. माणिकपूर ते धामनधस रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे
१ कोटी २० लक्ष रु. बहादा ते बेनोडा रस्त्यावर सा.क्र. ४ /०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे. १ कोटी ५० लक्ष रु. लिंगा करवार ते राममा ३५३ के रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष रु. नागझिरी माणिकपूर रस्त्याची सुधारणा सुधारणा करणे. २ कोटी ५० लक्ष रु. खडाका ते पांढरघाटी सा. क्र. ०/१०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ५० लक्ष रु. ब्राम्हणवाडा थडी अंबाडा आष्टगांव रस्त्याची सुधारणा करणे ता. मोर्शी २ कोटी ६० लक्ष रु. तिवसाघाट शे. घाट पुसला गणेशपुर मोबाड रामा ३१० मध्ये पोचमार्गासह लहान पुलाचे बांधकाम कारणे ३ कोटी रु. मंजूर केले केले असून या प्रमुख विकास कामांचा समावेश आहे. या सर्व विकास कामासाठी ७२ कोटी ३४ लक्ष १७ हजार रुपयांचे रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीर आभार मानले.

{ }
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी व अर्थमंत्रीपदी ना.अजितदादा पवार यांची निवड झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे मतदार संघातील विविध विकास कामासाठी निधीची मागणी केलेली होती त्यापैकी जुलै च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ७२ कोटी निधीला मंजुरी दिलेली असून उर्वरित कामे डिसेंबरच्या बजेटमध्ये मंजूर होतील त्याचप्रमाणे २५१५ निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी येईल, त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर असलेल्या कामावरील स्थगितीही उठेल . जुलै 2022 ते जुलै 2023 या कार्यकाळामध्ये निधी मिळण्यास अडचणी आल्या, परंतु आता तो अनुशेष भरून काढण्याचे काम सुरू आहे. — आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here