


🔸राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना
🔹बौद्ध तरुणांचा डबल मर्डर प्रकरण
✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
पुसद (दि. 21 जुलै):-राज्य शासन बौद्धांचे संरक्षण करू शकत नसेल तर केंद्र सरकारने बौद्धांसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी अशी प्रतिक्रिया दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी पीडितांच्या घरी जाऊन घेतली सांत्वनपर भेट आणि अंत्यविधीस उपस्थित राहुन मृतास आदरांजली वाहताना दादासाहेब शेळके म्हणाले की, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला 6 महिन्याच्या आत फाशीची देण्यात यावी.
पीडित कुटुंबास एक कोटी रुपयांची मदत, शासकीय नोकरी व पोलीस संरक्षण देण्यात यावे.बौध्दाना स्वंय संरक्षणात पिस्तूलचा परवाना देण्यात यावा.
तसेच समाजावर होणारे अन्याय अत्याचाऱाच्या वेळेस य पक्ष संघटना बाजूला ठेवून सर्वानी एक व्हावे व्हावे. मृत दोन्ही भीमसैनिकाना आदरांजली वाहून केवटे परिवाराच्या दुःखात भिम टायगर सेना सहभागी असल्याचे ते म्हणाले तसेच भिम टायगर सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सर्वच्या सर्व 6 आरोपी अटक झाल्याचे म्हटले आहे. असे दादासाहेब शेळके बोलत होते.
यावेळी भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे सह भिम टायगर सेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













