Home महाराष्ट्र मांडवा येथे अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन साजरा

मांडवा येथे अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन साजरा

186

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.18जुलै):-तालुक्यातील मांडवा येथे साहित्यसम्राट,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा ५४वा स्मृतीदिन लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौक येथे साजरा करण्यात आला.यावेळी नंदु आडे, नथ्थु ढोले, प्रकाश ढोले, नामदेव आबाळे,नामदेव आडे,दिलीप आडे, देवा आडे या उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दिलीप आडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच लोकसहभागातून चौकाच्या सुशोभीकरणाच्या कार्यासाठी समस्त ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन दाढे यांनी केले तर आभार देविदास गजभार यांनी मानले.यावेळी सचिन भेनिये, कृष्णा आडे,राजु दाढे, सुरेश लांडगे, समाधान लांडगे,शैलेश जाधव ,सम्राट गजभार,प्रसाद वाकोडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व समाज बाधंव उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here