Home महाराष्ट्र दत्ता पाटील हडसणकर यांच्या मराठा आरक्षणाच्या आमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा जाहीर...

दत्ता पाटील हडसणकर यांच्या मराठा आरक्षणाच्या आमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा

285

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 17 जुलै):-हदगाव तालुक्यातील भूमिपुत्र मराठा सेवक दत्ता पाटील हडसणीकर हे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 3 जुलै पासून हडसणी तालुका हादगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणास उमरखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाचा व सर्व समाजातील संघटनांचा जाहीर पाठिंबा दिला दिला आहे.

पाठिंब्याची निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आले.प्रशासनाने चालू असलेल्या आमरण उपोषणात त्यांची तब्येत खालावत असल्यामुळे लवकरात लवकर दखल घेऊन त्यांची मागणी पूर्ण करावी.अन्यथा आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाच्या मार्फत देण्यात आला आहे.यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here