Home महाराष्ट्र सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के ठरले शेतकऱ्यांसाठी कर्तव्यदक्ष अधिकारी !

सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के ठरले शेतकऱ्यांसाठी कर्तव्यदक्ष अधिकारी !

196

🔸हिवरखेड येथील सहाय्यक अभियंत्याची बदली ; हजारो वीज ग्राहक झाले भावूक !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.16जुलै):- तालुक्यामध्ये ‘गेल्या ७ वर्षांपासू हिवरखेड वीज वितरण केंद्राचे कर्तव्यदक्ष साहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांनी वीज ग्राहकांचा, शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी दिवस रात्र काशाचीही पर्वा न करता धडपड करणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली असून हिवरखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे वीज ग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध असणारे सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांना डोंगर यावली येथे हजारो शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.

कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची बदली हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. तो सरकारी अधिकारी आहे म्हणजे त्याची बदली ही होणारच. परंतू ज्या भागात तो काम करतो त्या भागासाठी केलेल्या कामाच्या जोरावर तो अधिकारी जनतेच्या गळ्यातीत ताईत बनतो. असाच एक अधिकारी म्हणजे महाराष्ट्र वीज वितरण कंपनी हीवरखेड केंद्राचे सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के होय. रोहित म्हस्के यांची हीवरखेड येथून अमरावती येथे नुकतीच बदली झाली आहे. बदली नंतर त्यांना देण्यात आलेला निरोप समारंभ मोर्शी तालुक्यात आगळावेगळा व चर्चेचा विषय ठरत आहे.

एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम मोर्शी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. हीवरखेड वीज वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के हे हिवरखेड मंडळात मागील ७ वर्षांपासून सर्व वीज ग्राहक व शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिवस रात्र मेहनत करून आपली प्रामाणिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.

सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांनी ७ वर्षाच्या काळामध्ये कार्यभार पाहतांना सर्वसामान्यांशी संपर्क वाढवतांना सर्व वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडून शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये व शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मोर्शी तालुक्यातील कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संवेदनशील सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांची सहाय्यक अभियंता पदी अमरावती येथे बदली झाल्याबद्दल त्यांना डोंगर यावली येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला.

यावेळी रोहित म्हस्के यांनी सांगितले की, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करीत असतांना एक ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे. आपण आपल्या कार्यालयात ‘टिम वर्क’ म्हणून काम केले तर कितीही कठीण काम असले तरी त्या कामाचे सहज निराकरण करणे सोईचे होते. असे मत सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांनी व्यक्त केले. शासनाने आपल्याला ज्या कामाची जबाबदारी दिलेली आहे त्या कामाची जबाबदारी स्विकारुन आपण आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असल्याचे प्रतिपादन रोहित म्हस्के यांनी केले.

यावेळी निरोप समारंभ कार्यक्रमाला सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के, माजी सरपंच नितीन काकडे, उपसरपंच कांचन कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, मनीष गुडधे, ग्राम पंचायत सदस्य शरद कटोलकर, प्रशांत राऊत, दुर्गेश केचे, मंगेश गावंडे, महावितरण कंपनीचे कर्मचारी यांच्यासह डोंगर यावली, दापोरी, घोडदेव, हिवरखेड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here