Home चंद्रपूर युवासेना चिमूर तालुक्याच्या वतीने दहावी-बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

युवासेना चिमूर तालुक्याच्या वतीने दहावी-बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

172

चिमूर – युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना कार्यकारी सदस्य रुपेश कदम, हर्षल काकडे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी, यांचे मार्गद्शनात युवा सेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांचे नेतृत्वात चिमूर तालुक्यातील दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रीय विद्यालय चिमूर व भयुजी महाराज विद्यालय चिमूर येथे करण्यात आला. यावेळी न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथील कु नयन गुणवंत ठाकरे, वेदांत किशोर कामडी, अवंतिका दिलीप पाचभाई, मानसी रविंद्र हजारे, प्रियांशू बालाजी साठोने, श्री संत भयुजी महाराज विद्यालय येथील कू शिपाली पारस देवगडे, कू तनिषा दुर्योधन मेश्राम, कू साक्षी ईश्वर सावसाकडे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, तालुका समन्वयक देविदास गिरडे, युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, प्रसिध्दी प्रमुख सुनील हिंगनकर, प्रा. डॉ. दिवाकर कुंभरे, न्यू राष्ट्रीय विद्यालयच्या शिल्पा ढाकूनकर, राजेंद्र मोहितकर, रोकडे मॅडम, नवाते सर, श्री भय्यू महाराज विद्यालयचे मोहिंनकर मॅडम, गजभिये सर, तिडके सर, दिपंकर धोटे सर, पंधरे सर, लोहकरे सर, वानखेडे सर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here