Home चंद्रपूर जागतिक लोकसंख्या दिनी वृक्षारोपण

जागतिक लोकसंख्या दिनी वृक्षारोपण

160

सहसंपादक //उपक्षम रामटेके 📱9890940507
चंद्रपूर:-जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून दिनांक 11-7- 2023 ला सेवा दल विधायक कार्य समिती व सामाजिक समरसता मंच चंद्रपूर कडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात. आला कार्यक्रमाला सामाजिक समरसता मंचाचे जिल्हा संयोजक डॉ नंदकिशोर मैंदळकर,सेवादल मुलींचे वस्तीगृह अधीक्षिका कोमल आक्केवार,सुभाष नरुले, सचिन बरबटकर, सुदर्शन नैताम, गंगाधर गुरूनुले, प्रदीप गोविंदवार, तुषार आक्कवर, कविता शेंडे, नितीन चांदेकर तसेच संस्थेचे पदाधिकारी वस्तीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. जगातील लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे आणि वृक्षाचे, जंगलाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी असे तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे. माझी वसुंधरा व माझे कर्तव्य समजून घ्यावे आज वृक्षारोपणाची करण्याची गरज आहे. तेव्हा वसुंधरे प्रती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजाचेही दायित्व आहे.समाजातील सामाजिक संस्था मंडळे सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षरोपण करून वसुंधरेचे जतन करावे, ,”जहा हरियाली वहा खुशहाली” प्रत्येकांनी आपल्या वाढदिवशी जयंती, पुण्यतिथी, लग्नाचा वाढदिवस किंवा धार्मिक कार्य करताना किमान वृक्ष लागवड करावे. अथवा वृक्ष दान करून इतरांनाही प्रेरित करावे. आज आपण वृक्षाची लागवड व संवर्धन केल्यास वसुंधरा, निसर्ग आपल्या जीवनवृद्धीस मदतगारच ठरेल. स्वच्छ सुंदर आरोग्य दायी जीवन मिळेल.तेंव्हा आपण सर्वांनी एक प्रण करूया स्वच्छ सुंदर हिरवीगार वसुंधरा बनवूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here