Home महाराष्ट्र अजित मीच आहे

अजित मीच आहे

181

सांगती प्रफुल्ल होवूनी
बोला पटेल तेची
हाणतो टोला असाच की ,
अजित मीच आहे

पन्नास खोक्यांचा तेव्हा
निषेध मीच केला
त्यांच्या समेत आता
मीच ओके आहे

दौलत जिथे तिथेची
दरोडा हा अपेक्षित
संग्राम हा तसाची , बघा
जग ताप चालू आहे

काढुनी सांगा भुज
बळ ते कसे उरावे ?
उरल्या मसल उलुशा ,तरी
पॉवर फुल मीच आहे

हसन मज सगळे जरी हे
मुंडेचं ते म्हणावे!
असे खूप पाहिले तट करे मी
पॉवर फुल मीच आहे

आता वाटे एकनाथा
मी , ना अजित झालो
गुलालात त्या उधळत्या
मी मात्र चीत झालो
(अपूर्ण)

✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here