


✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.7जुलै):-तालुक्यातील लिंबागणेश येथील वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्त्यांची कामे सुरू केली असुन शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामे करण्यात यावीत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.६ जुलै गुरुवार रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती अनिरुद्ध सानप, शाखा अभियंता वाघ, स्थापत्य अभियंता अरविंद दुबाले, तांत्रिक अधिकारी गवते ,सपोनि नेकनुर पोलिस स्टेशन विलास हजारे,पोउनि.पानपाटील,पो.हे.क्षीरसागर,पो.हे. डिडुळ,पोलिस अंमलदार ढाकणे, तांदळे यांनी स्विकारले यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव,माजी राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, रविंद्र निर्मळ, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, पांडुरंग वाणी, बाळासाहेब मुळे, अँड.गणेश वाणी, अभिजित गायकवाड, तुकाराम गायकवाड,अक्षय वायभट आदि ग्रामस्थ सहभागी होते.
सविस्तर माहितीस्तव
—
बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथील शेत वस्तीवरील ग्रामस्थांनी मुलांचे शालेय शिक्षण, दवाखाना, बाजार हाट तसेच खत, बी- बियाणे , शेतीमाल, भाजीपाला यांची पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून वाहतूक करावी लागत असुन शासन दरबारी वारंवार निवेदने तसेच आंदोलने करुन सुद्धा दखल न घेतल्याने “ढवळे वस्ती” गिरे वस्ती ” रणखांब वस्ती”आणि वाणी वस्ती येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रस्ता काम सुरू केले असून त्याचे मजबुतीकरण शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ते करण्यात यावेत.
तसेच व काळेवाडी ,गणेश नगर, कदम -ढास वस्ती, नाईगडे वस्ती,मोरे वस्ती आदि रस्त्यांसाठी मनरेगा अंतर्गत पाणंद/शेत रस्ते मंजूर करून तातडीने पूर्ण करण्यात येऊन लिंबागणेश ते बोरखेड रस्त्यावरील नळकांडी पुलाच्या संरक्षण भिंत गेल्या वर्षीच्या पावसात ढासळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असुन तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.













