Home पुणे “शब्दांचा पाऊस कवितेचे हाऊस” काव्य महोत्सव संपन्न

“शब्दांचा पाऊस कवितेचे हाऊस” काव्य महोत्सव संपन्न

197

 

पुणे (दि. 4 जुलै):-
पुणे येथील वाकड या ठिकाणी असलेल्या अव्हेन्यू कल्चरल च्या सभागृहात मंडळ आस्थापनात भव्य असे कविसंमेलन पार पडले.

साहित्य सारथी कला मंच ही साहित्यिक संस्था मागील पाच वर्षापासून लातूर जिल्ह्यात कार्यरत असून पुणे येथे या साहित्यिक संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध युवा व्याख्याते जगदीश ओहोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार अरुण कटारे हे उपस्थित होते.
साहित्य सारथी कला मंच ही साहित्यिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर साहित्य चळवळ उभी करण्यात अग्रेसर राहील असे मत संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले.
साहित्य सारथी कला मंच च्या आस्थापन मंडळाच्या या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.प्रशांत पाटोळे तर उपाध्यक्ष पदावर कवी व अभिनेते कवी पांडुरंग म्हस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून कवी दिनेश कांबळे कोषाध्यक्ष पदावर कवी तानाजी शिंदे,सचिवपदी प्रा. दिलीप वाघमारे तर सहसचिव म्हणून सागर वाघमारे
तसेच संस्थेचे सल्लागार म्हणून ॲड. उमाकांत आदमाने यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षांच्या वतीने त्यांना निवड पत्र देऊन गौरवण्यात आले.
या कविसंमेलनात ऐंशी पेक्षा जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवला
या नियोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळयाचे सूत्रसंचालन प्रा. विजय अंधारे यांनी केले काव्य महोत्सवाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे प्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून ओघावत्या शैलीत बहारदार सूत्रसंचालन करून रसिकांची व साहित्यिकांची मने जिंकली या कविसंमेलनासाठी अनेक जिल्ह्यातून कवींनी हजेरी लावली जयश्री सोनवणे प्रा अशोक शिंदे आनंद गायकवाड चंद्रकांत जोगदंड अरूण कांबळे बालकवी निखिल सोनवणे राजश्री वाणी दीपिका कटरे लक्ष्मीदेवी रेड्डी राहुल भोसले राजेंद्र भोसले प्रल्हाद शिंदे आदी कवी कवयत्रीच्या कवितेने मनाला भूरळ पाडली विविध विषयांवर रचना सादर केल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले तर आभार पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटोळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी समीर किशोर सर , डॉ सुनील उगीले सर, प्रा दिलीप वाघमारे ,दिनेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.प्रा दिलीप वाघमारे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here