Home महाराष्ट्र दूध उत्पादक शेकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च आधार मार्केट प्लस इंडिया प्रा. लि.संस्थेतर्फे...

दूध उत्पादक शेकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च आधार मार्केट प्लस इंडिया प्रा. लि.संस्थेतर्फे करणार : जावेदखन मुलाणी

121

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : जनसहयोग सामाजिक संस्था नरवणे व मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत आधार मार्केटप्लेस इंडिया प्रा लि. तर्फे आधार दूध संकलन केंद्रावरील éदूध उत्पादक शेतकरी बांधवांच्या शाळकरी मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च संस्थेमार्फत करण्यात येईल अशी घोषणा संस्थेमार्फत केली होती.
सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात दूध उत्पादक शेतकरी यांच्या मुलांना शालेय किट (वह्या, शालेय साहित्य) संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे मानद सचिव श्री सूरज मुलाणी व संचालक श्री किरण चव्हाण आणि सर्व संचालक मंडळ यांचेमार्फत करण्यात आले. शालेय साहित्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी चा भार देखील संस्थेमार्फत करण्यात येईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले होते. लवकरच ती प्रक्रिया सुद्धा पार पडेल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष सन्मा. अनिलभाऊ देसाई यांच्या मार्गदर्शना खाली मुक्तागिरी मुक्तांगण फाऊंडेशन व जनसहयोग सामाजिक संस्था यांचे मार्फत सुरू करण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे काम देखील लवकरच पूर्णत्वास येईल असे संस्थेचे अध्यक्ष जावेदखान मुलाणी यांनी सांगितले तसेच पुढे बोलत असताना जावेद खान मुलाणी यांनी माननीय अनिल भाऊ देसाई यांनी आपल्या संस्थेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि वेळोवेळी असेच मार्गदर्शन रहावे ही इच्छा व्यक्त केली……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here