Home महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यात गुन्हे तपास व शोध कामगिरीसाठी प्रथम क्रमांक (पुसद शहर...

यवतमाळ जिल्ह्यात गुन्हे तपास व शोध कामगिरीसाठी प्रथम क्रमांक (पुसद शहर पोलीस स्टेशनची सर्वोत्तम कामगिरी)

131

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ (दि.16 जून) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्याचा अतिशय कमी वेळात पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने योग्य तपास करून गुन्हेगाराचा शोध घेतला त्यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी मे. महीण्यात घेतलेल्या क्राईम मिटींग मध्ये पुसद शहर पोलीस स्टेशन यांनी गुन्हे तपास व शोध कामगिरी मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून यवतमाळ जिल्हा पोलीस दलात पहीला क्रमांक प्राप्त केला. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड व अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून पुसद शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, सहा.पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार व डी.बी. प्रमूख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम पो. हवा. प्रफूल इंगोले, दिनेश सोळंके, पोलिस नाईक विवेक सुर्यवंशी, शूध्दोधन भगत, वैजनाथ पवार, आकाश बाभूळकर यांना सन्मानीत करण्यात आले.

जिल्हा पोलीस प्रशसनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या गुन्हयाचा मागील महीण्यात केलेल्या उत्कृष्ट डिटेक्शनची माहीती जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधून मागविण्यात येवून ज्या पोलीस ठाणे व अधिकारी यांनी पोलीस दलातील कौशल्याचा त्यामध्ये टेक्नॉलॉजी, सायबर, गोपनीय माहीती यांचा योग्य वापर करून अतिशय उत्कृष्टरित्या डिटेक्शन व तपास केलेला असेल त्यांचा प्रत्येक महीण्याचा मिटींग मध्ये सन्मान केला जातो. मागील महीण्यात पुसद शहर पोलीसांनी अप.क्र.332/ 2023 कलम 457, 380 भा.द.वी. या गुन्हयातील 02 मोबाईल व सोन्याचे गंठण चोरणा-या आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून 24 तासाचे आत सदर आरोपींस उमरखेड जि. यवतमाळ येथून शोधून काढून त्याचे कडून गुन्हयात गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. या कामगिरी करता तपास कामी योग्य ते मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ तपास करणारी टीम सहायक पोलीस निरीक्षक केदार साहेब, व डी.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम पोलीस हवालदार. प्रफुल इंगोले,दिनेश सोळंके विवेक सुर्यवंशी, शूध्दोधन भगत, वैजनाथ पवार,आकाश बाभूळकर यांचा गुन्हे तपास व शोध कामगिरी मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचा चषक देवून गौरव करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here