Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !… पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना...

महात्मा फुले हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !… पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत !…

146

 

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १५ जून शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या गेटला फुलांनी सजविण्यात आले, तोरण बांधले. सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार , ज्येष्ठ शिक्षिका पी.आर. सोनवणे व ग्रंथपाल गोपाल पंढरीनाथ महाजन यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वर्ग ५ वी ते वर्ग ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. वर्ग ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here