Home महाराष्ट्र मुली मुलाच्या सत्यशोधक विवाहनंतर आई वडिलांनी केला रौप्यमहोत्सवी निमित सत्यशोधक विवाह !!!...

मुली मुलाच्या सत्यशोधक विवाहनंतर आई वडिलांनी केला रौप्यमहोत्सवी निमित सत्यशोधक विवाह !!! फुले एज्युकेशन तर्फे मोफत 41 वा.सत्यशोधक विवाह संपन्न.!!!

146

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

 

म्हसवड : – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक गोविंद खंडू माळी व सत्यशोधिका रत्ना गोविंद माळी यांनी आपल्या रौप्य महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने दुबार लग्न महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पध्द्तीने सत्यशोधक विवाह करून परिवर्तन सोहळा नुकतेच रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुसळगाव सिन्नर येथील बहुद्देशीय सत्यशोधक केद्रात पार पडला .या पूर्वी त्यांनी आपल्या मुलीचा सत्यशोधीका मायाचा सत्यशोधक विवाह १९ जुलै २०२० रोजी लावला होता तर नुकतेच त्यांच्या मुलाचा सत्यशोधक सचिनचा देखील ९ मार्च २०२३ रोजी सिन्नर येथे सत्यशोधक विवाह सोहळा शानदार पणे संपन्न केला होता. या व्यतरिक्त त्यांनी जावई बंधूचे देखील १९ जुलै २०२१ रोजी विवाह लावून दि.१मे २०२३ रोजी महारष्ट्र दिनी भाची गायत्री गाडेकर यांचा देखील सत्यशोधक विवाह आयोजक म्हणून पार पाडणार आहेत.

विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यावेळी म्हणाले की गोविंद माळी यांना 25 वर्षापूर्वी या विवाह विषयी माहिती नसल्याने त्यांचा भटजी ने विवाह लावला.परंतु फुले साहित्य वाचलेवर खरे खोटे आणि आपल्या लोकावर असलेला धार्मिक पगडा या गोष्टीमधील सत्य कळाले म्हणून त्यांनी वरील सर्व जणाचे सत्यशोधक विवाह सोहळे फुले एज्युकेशन च्या बहुउदेशीय सत्यशोधक केंद्राकडून रजिस्टर नोंदणी करून पार पाडले. हे भाग्य आमच्या संस्थेला लाभले ही एक ऐतिहासिक घटना या विज्ञान युगात घडली म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.हा आदर्श प्रत्येक कुटुंबाने घेतला तर भारतातून अंधश्रध्दा , कर्मकांड ,पंचाग गायब होण्यास वेळ लागणार नाही.
त्यासाठी बहूजनातील उच्च शिक्षण घेतलेल्या वधू वर कुटुंबाने अनुकरण केले तर गरीब लोक लगेच अनुकरण करतील. याकामी गोविंद माळी ने जे काम केले ते अप्रतिम आहे.
यावेळी सत्यशोधक गोविंद व रत्ना माळी याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा व सावित्रीबाई फुले अर्धपुतळा विधिकर्ते अध्यक्ष रघुनाथ ढोक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांचे हस्ते देण्यात आले.हा सोहळा मुलगा सत्यशोधक सचिन व सूनबाई अक्षदा हिने घडवून आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here