Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने डॉ. ए. पी. के. संघरत्ने...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने डॉ. ए. पी. के. संघरत्ने समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

131

 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने डॉक्टर असलेले ए. पी. के. संघरत्ने यांचा १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुन्ना सभागृह अड्याळ येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. संघरत्ने यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ संघरत्ने हे रुग्णांकडून अल्प फी आकारून रुग्णांची सेवा करीत असतात. रात्री- बेरात्री कुणाचे फोन आले तर त्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. वेळेवर गरीब रुग्णांकडे पैसे नसले तर पैसे सुद्धा घेत नाही. समाजकार्यात नेहमी मदत कार्य करतात. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ संघटक महेंद्र नंदागवळी, भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, शंकर भेंडारकर, संजय नासरे, के. एल. गजभिये, दिलीप मोटघरे, प्रशांत रामटेके, पारमिद मोटघरे, बालाजी लांजेवार, नितीन राऊत, अमित तिरपुडे, अमित रामटेके, यशवंत वैद्य, उमराव सेलोकर, कुंजन शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here