Home महाराष्ट्र फुले एज्युकेशन तर्फे सिन्नर ला महाराष्ट्र दिनी होणार ४० वा सत्यशोधक विवाह

फुले एज्युकेशन तर्फे सिन्नर ला महाराष्ट्र दिनी होणार ४० वा सत्यशोधक विवाह

161

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा.9075686100

म्हसवड : फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि.१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी दु.१२.३० वा. माऊली लॉन्स ,सिन्नर मध्ये सत्यशोधक प्रशांत अशोक शेळके , सिन्नर आणि समाजसेवक सत्यशोधक गोविंद माळी यांची भाची सत्याशोधिका गायत्री विठ्ठल गाडेकर ,संगमनेर यांचा मोफत ४० वा .सत्यशोधक सोहळा संपन्न होणार आहे.गोविंद माळी यांचे घरात या संस्थेतर्फे ४ था सत्यशोधक विवाह सोहळा होत आहे,

या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात येणार आहे.तर आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी अक्षता म्हणून नेहमीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार आहे तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे ,सत्यशोधक गोविंद माळी आणि दीपक मंडलिक करणार आहेत.

आयोजक गोविंद माळी म्हणाले की आमच्या परिवाराने अंधश्रद्धा कर्मकांड याला मूठमाती दिली आणि प्रथम मुलीचे ,पुढील वर्षी त्याच तारखेला जावई बंधूचे आणि नुकतेच मुलाचे आणि आता भाचीचे महाराष्ट्र दिनी ,महात्मा फुले यांनी दिलेल्या आदर्श पध्द्तीने सत्यशोधक विवाह पार पाडीत असून याला दोन्ही कुटुंबाने समाजपरिवर्तन होणे कामी साथ दिली आहे. सर्व विवाह यशस्वी होऊन वधू वर गुण्या गोविदाने नांदत आहेत. आपल्या मनावर नाहक येनकेनप्रकारे जो पगडा घातला गेला कि भटजी कडूनच विवाह लावावेत ही प्रथा लोकांनी आता बंद केली पाहिजे. पुढे माळी यांनी सांगितले की महात्मा फुले म्हणतात की कोणत्याही विधी कार्यासाठी ठराविक मध्यस्थाची गरज नाही, आपणच आपले कार्य पार पाडावीत. तरी मी सर्व समाजाला आव्हान करतो की आर्थिक उधळपट्टी न करीता ,गरजूंना मदत करीत सत्यशोधक पद्धतीने मुहुर्थ ,पंचांग न पहाता दोन्ही कुटुंबाची योग्य सोयीची वेळ पाहून सध्या सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने विविध कार्ये पार पाडवीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here