


विशेष प्रतिनिधी //योगेश मेश्राम
चिमूर येथे दि.११ एप्रिल ला
नेचर फाउंडेशन द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धे करिता डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे भारतीय समाजाच्या जडणघडणीतील योगदान हे दोन विषय होते.
या निबंध स्पर्धेला चिमूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.१४ एप्रिल ला करण्यात आले. या स्पर्धेत अंतरा ढोक शंकरपूर प्रथम ,अस्मिता ढोणे कोटगावं द्वितीय,श्रुती शेंडे मोठेगावं तृतीय आणि सोनू गरमळे, निखिल रामटेके यांना स्नेहा नन्नावरे संचालिका द सनशाईन स्कूल भिसी, प्रा.अमर ठवरे,नेचर फाउंडेशन चे सचिव निलेश नन्नावरे,राकेश जीवतोडे यांच्या हस्ते प्रोत्याहनपर बक्षीस वितरण करण्यात आले, या कार्यक्रमाचे संचालन अस्मिता ढोणे व आभार प्रदर्शन
पुनम गजबे यांनी केले.












