Home महाराष्ट्र आमदार देवेंद्र भुयार यांनी केली वरूड मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी !...

आमदार देवेंद्र भुयार यांनी केली वरूड मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी ! नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले निर्देश !

187

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
निर्गाचेही कालचक्र बिघडल्याने आहे शेतकरी अडचणीच्या कात्रीत सापडला आहे. वरूड मोर्शी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. दिनांक २० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे परपिटीमुळे शेतकऱ्यांचा संत्रा, मोसंबी, गहू, भाजीपाला यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांचेही नुकसान झालेले आहे. या अवकाळी आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची आमदार देवेंद्र भुयार यांनी मौजा अमडापूर, राजुराबाजार, वडाळा, वंडली येथे झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची शेतबांधावर जावून प्रशासकीय अधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून आढावा घेतला.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत
होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दाखल घेणे आवश्यक असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी तहसीलदार कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश देवून नुकसानग्रस्त यांना आर्थिक मदत मिळऊन देण्यासाठी तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
आधीच अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यात आता पुन्हा अवकाळी वादळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन आधार द्यावा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मदत पुनर्वसन विभागाकडे केली आहे.

मोर्शी वरुड मतदार संघात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळऊन देण्याकरिता महसुल विभाग आणि कृषि विभाग यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई अहवाल शासनाकडे सादर करण्या बाबत निर्देश दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत राज्यशासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळऊन देणार — आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here