Home चंद्रपूर पाण्यासाठी चिमुरातील टिळक वॉर्डातील महिलांचा एल्गार..नियमित पाणी पुरवठ्यासाठी दिले निवेदन…पाणी पुरवठा सुरळीत...

पाण्यासाठी चिमुरातील टिळक वॉर्डातील महिलांचा एल्गार..नियमित पाणी पुरवठ्यासाठी दिले निवेदन…पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन

166

 

चिमूर –

चिमूर शहरातील टिळक वॉर्ड. गांधी वार्ड येथील नळाला अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्यामुळे टिळक वॉर्डातील महिलांनी एल्गार पुकारला असून नगरपरिषदला निवेदन देण्यात आले.
चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 व पाच टिळक वॉर्ड-गांधी वार्ड या भागात एक महिन्यापासून नळाला कमी प्रमाणात पाणी येत असल्याने पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वॉर्डातील जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित होण्याची परीस्थिती निर्माण झाली असल्यामुळे वॉर्डातील महिला वर्गाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या पूर्वी चिमूर ग्राम पंचायत असताना कधी पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. परंतु नगर परिषद प्रशासनाच्या नियोजन शून्य ढिसाळ कारभारामुळे आज महिला आक्रमक होत एल्गार पुकारला असून पहिला टप्प्यात निवेदन देण्यात आले. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दाखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
निवेदन देते वेळी माजी सरपंच लक्ष्मीकांत बावनकर, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात सोनू बावनकर, पंचफुला वजरे, शीतल कठाने, हर्षा बावनकर, मोना बनकर, संगीता बनकर, नंदा बनकर, वर्षा कोथोडे, प्रिया हरदास, मंजू चांदेलकर, ममता बनकर व वॉर्डातील अन्य महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here