Home महाराष्ट्र दहागाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निम्मित झाले प्रबोधनात्मक कार्यक्रम

दहागाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निम्मित झाले प्रबोधनात्मक कार्यक्रम

136

 

✒️ सिद्धार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 12 एप्रिल) शहरागतच असलेल्या दहागाव मध्ये जो व्यक्ती जाईल तो तेथील विहारात काही क्षण थांबल्या शिवाय माघारी फिरणारच नाही अशा सुंदर प्रकारच्या विहारांमध्ये महापुरुषांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी कुठल्याही जातीभेद मनात न बाळगता प्रत्येक महापुरुषांची जयंती या विहारांमध्ये साजरी करण्यात येते आज 11 एप्रिल 1827 रोजी ज्या क्रांतीसुर्याचा जन्म झाला त्यांचे नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काही चिमुकल्याने आपले मनोगत व्यक्त केले तसेच काही सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून मुलांमध्ये एक प्रकारचा चैतन्य, त्यांच्या आचरणात शुद्धता तसेच महापुरुषांबद्दल आदर निर्माण करण्यासाठी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये काही गावातील लहान मुलांनी भाषण, गीत तसेच एकपात्री नाटक करून महात्मा फुले बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

काही सहभागी बौद्ध विहार सदस्य सदाशिव धुळे, बबनराव मुनेश्वर,पांडुरंग मुनेश्वर यांनी आपल्या वक्तव्याचा माध्यमातून शिक्षनाचे महत्त्व पटवून दिले.

“दारिद्र्य मुलांनी विद्येस शिकावे, भिक्षांन्न मागावे पोटापुरते ! विद्वान वृद्धांनी विद्या दान द्यावे, भिक्षेकरी व्हावे गावामध्ये”..!

अशा प्रकारचे संदेश देऊन बामसेफ संघटनेचे प्रतिनिधी अत्तदीप धुळे यांनी सुद्धा नवीन पिढी घडवण्याच्या दिशेने पाऊल उचलले.

गावातील एक निर्भीड महिला म्हणजे वर्षाताई कदम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून अतिशय सुंदर अशा प्रकारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार गावातील महिलांना दिले.

काही विद्यार्थ्यांमधून अतिशय सुंदर अशा प्रकारे व्याख्यान करणाऱ्या यश मूनेश्वर याचा प्रथम क्रमांक, मोनिका बारस्कर द्वितीय क्रमांक,भावना मुनेश्र्वर तृतीय क्रमांक असे क्रमांक काढून त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here