Home महाराष्ट्र जयदीप फौंडेशनच्या वतीने कोरोना काळात छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जयदीप फौंडेशनच्या वतीने कोरोना काळात छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

144

✒️सचीन म्हसवड(विशेष प्रतिनिधी)

म्हसवडदि.9मार्च):-मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थनाच करणारा असतो………! काही काही सत्कर्म अशीही करावीत की, ज्याचा साक्षीदार देवा शिवाय दुसरा कोणीच नसावा या पंक्तीना साजेस व्यक्तिमत्व असणारे जयदीप फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयदीपशेठ शिंदे यांनी आज लक्ष्मी नारायण हायस्कुल खटाव या शाळेतील कोरोना काळात ज्या विध्यार्थ्याच्या डोक्यावरील छत्र हरपले अशा दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च जयदीप फौंडेशनने जबाबदारी घेतली.

जयदीप फाउंडेशनच्या माध्यमातून आज 8/4/2023 या दिवशी कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरपले अशा श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल खटाव मधील 10 विद्यार्थ्यांना आज 2023/24 या शैक्षणिक वर्षासाठी,शैक्षणिक दत्तक घेण्यात आले.

गणवेश, बॅग, वह्या, पुस्तके कंपास पेटी, तसेच इतर शालेय साहित्य व या वर्षीच्या त्यांच्या शिक्षणासाठी येणारा आर्थिक खर्च ,कॉम्पुटर शिक्षण याचा या मध्ये समावेश आहे.श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल खटाव चे मुख्याध्यापक श्रीयुत पोटफोडे सर व सहशिक्षक श्री काशीद सर यांचा सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असल्याचे जयदीप शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here