Home गडचिरोली प्रा. डॉ. महेश जोशी यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हा सहसचिव...

प्रा. डॉ. महेश जोशी यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हा सहसचिव पदी निवड

230

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली (चामोर्शी)(दि.4एप्रिल):- स्थानिक केवळरामजी हरडे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. महेश जोशी यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा कार्यकारणी सहसचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली. सिटी हार्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, धानोरा रोड,गडचिरोली येथे झालेल्या सभेमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय सहसचिव श्री.जयंतीभाई कथेरियाजी व विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायन मेहरे यांनी जाहीर केली.

जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे व जिल्हा सचिव उदय धकाते यांच्या सोबत जाहीर झालेल्या कार्यकारणीत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. महेश जोशी यांनी राष्ट्रीय सहसचिव व प्रांतअध्यक्ष यांचे आभार व्यक्त केले .

डॉ महेश जोशी यांनी समस्त चामोर्शी परिसरातील जनतेस आव्हान केले आहे की, ग्राहक म्हणून कुठल्याही ठिकाणी आपली फसवणूक होत असल्यास ग्राहक हक्कासाठी ही अखिल भारतीय स्तरावरील संघटना आपल्या सेवेत सदैव तयार आहे.डॉ महेश जोशी यांच्या निवडीबद्दल यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे, सचिव डॉ स्नेहा हरडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here