Home महाराष्ट्र माय, तुम्ही माझ्या आई सारख्या तुमचं नुकसान करून मला काय मिळणार आहे?

माय, तुम्ही माझ्या आई सारख्या तुमचं नुकसान करून मला काय मिळणार आहे?

151

🔹फेरीवाल्यांच्या बैठकीत आ.डाॅ.गुट्टेंचा सरूबाई खरात यांना सवाल

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29मार्च):-तुमचे स्थलांतर करून तुमच्यावर अन्याय करणार नाही. तुमची रोजीरोटी त्या व्यवसायावर आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करतोय. तुम्हाला रीतसर जागा आणि बांधकाम करून देतो. तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. माय, तुम्ही माझ्या आई सारख्या तुमचं नुकसान करून मला काय मिळणार आहे?असा सवाल फेरीवाल्यांच्या बैठकीत आ.डाॅ.गुट्टेंनी भाजीपाला विक्रेत्या सरूबाई खरात यांना उद्देशून केला.

शहराच्या नियोजन आराखड्यानुसार सर्व फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेत्यांचे स्थलांतर जुन्या शनिवार बाजार परिसरात केले जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने सर्व फेरीवाल्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी तुकाराम कदम, नगर अभियंता रमेश वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, इकबाल चाऊस, सचिन नाव्हेकर, उध्दव शिंदे, सचिन महाजन, वैजनाथ टोले उपस्थित होते.

या बैठकीत सर्व फेरीवाल्यांच्या शंका व प्रश्नांस आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे आणि कार्यकारी अधिकारी तुकाराम कदम यांनी सविस्तर उत्तरे दिली. तसेच प्रत्येक फेरीवाल्याचे मत ऐकून घेतले. त्यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासाची संकल्पना समजावून सांगितली. भविष्यातले चित्रही त्यांच्या समोर मांडले. याप्रसंगी सर्व फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी गर्दी केली होती.

पुढे बोलताना आ.डाॅ.गुट्टे म्हणाले की, गंगाखेड शहरास शिस्त लाऊन पायाभुत सुविधा व नागरी प्रश्न सोडविण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. शनिवार बाजार येथील बांधकाम पूर्ण झाल्यास तुम्हाला स्थलांतर करण्यात येईल. तोपर्यंत तुमच्यावर कोणतीही कारवाई नगर परिषद प्रशासन करणार नाही. आज जर आपण हे प्रश्न सोडविले नाहीत. तर भविष्यात खूपचं गुंता वाढेल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा विचार करून आपण हे स्थलांतर करीत आहोत. मी तुमच्या विरोधात कधीही जाणार नाही. मात्र, तुम्ही सुध्दा शहराच्या विकासाचा आराखडा समजून घ्या. तुमचे कोणतेही नुकसान होवू देणार नाही. प्रत्येक फेरीवाल्यास तिथे ६० स्केअर फुट जागा आणि बांधकाम करून देणार आहे.

दरम्यान, स्वच्छ व सुंदर गंगाखेड हि संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी हे स्थलांतर महत्वाचे आहे. त्यामुळे शहराला शिस्त लागेल. त्या दृष्टीने आ.डाॅ.गुट्टे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. शहरात सर्वे करून ७०० फेरीवाल्यांना नगर परिषद प्रशासनाने ओळखपत्र व परवाना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती समूह संघटक वंदना परतकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here