Home महाराष्ट्र भिसी मध्ये सलाम किसान ने पार केला तब्बल १००० माती परिक्षणचा टप्पा,...

भिसी मध्ये सलाम किसान ने पार केला तब्बल १००० माती परिक्षणचा टप्पा, शेतकरीही झाले खुश!

194

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.21मार्च):-भिसी येथे प्रथमच सलाम किसान समूहाकडून मोफत माती परीक्षण कार्यक्रम केला गेला; तेही ९० सेकंदात माती परीक्षण हे तंत्र बघून शेतकरी वर्ग स्टॉल समोर तुटून पडला होता. शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. व ड्रोन चे फायदे ही त्यावेळी समजावून सांगितले होते. ड्रोनमुळे होणारी आर्थिक बचत, वेळेची बचत, कष्टाची बचत इत्यादी बाबी त्यावेळी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या गेल्या होत्या.

आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे सलाम किसानने भिसी परिसरात एक हजारांपेक्षा जास्त मोफत माती परीक्षण पार केले आणि एकाच ठिकाणी एक हजार हा आकडा पार करण्याचा विक्रम स्वतः समूहाने मोडला आहे.कपरला आणि बोरगाव (बुटी) यासारखी छोटी गावेसुद्धा सलाम किसान समूहाने समाविष्ट केली आहेत.

सलाम किसानचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन स्टॉल होते त्यामध्ये एक बस स्टॉपवर आहे तर दुसरा भिसी येथील बाजारपेठेच्या ठिकाणी दोन्ही दिशांना आणि गावामध्ये शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आहे.शेतकऱ्यांना माती परीक्षणाच्या महत्त्वाबद्दल शिक्षित आणि जागरूक करणे हा ही उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सलाम किसान समूहाने त्याठिकाणी महत्वाची भूमिका पार पाडली.

सलाम किसान समूहाने नेहमीच ग्रामीण भागात सेवा आणि कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती देत शेतकऱ्यांना आनंद देत आपलंसं करून घेतले आहे.त्याचप्रमाणे भिसी परिसरात स्वयंसेवकांनी एकनाथी भागवत सप्ताहात लोकांना मुक्तपणे स्वयंसेवा करण्यासाठी आणि अन्न वाटपासाठी सहभाग घेतला आहे.अशाप्रकारचे कार्य बघताना सलाम किसान कृषी क्षेत्रात घेत असलेली तंत्रज्ञानाची भरारी आणि शेतकरी समाजाविषयी असलेलं प्रेम ही बाब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here