


🔹शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार यांची मागणी
✒️नागभिड तालुका(संजय बागडे)मो:-९६८९८६५९५५
नागभिड(दि.20मार्च):- तालुक्यात अचानक मेघगर्जना,दोन दिवस वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस व गारपीट झाली झालेल्या गारपीट मुळे नागभीड तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन गारपीट व वादळी वाऱ्याने व पाऊसाने रब्बी पिकासह गहु,हरभरा,इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.,आंब्याच्या झाडाला आलेला बहर व आंबे गळुन पडले आहे.
बागायती शेतीचे प्रचंड मोठ्या फटका बसला असुन नुकसान झाले आहे, शेतकरी राजाला धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने संप चालू असेल तरी सुशिक्षित बेरोजगार कृषि युवकां कडुन पंचनामे मा, तहसीलदार यांनी करुण घ्यावे, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळून द्यावी,अशी मागणी नागभीड शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ,तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार यांनी वृतपञाच्या माध्यमातुन केली आहे,














