Home महाराष्ट्र महिलांनी आपले हक्क व अधिकारासाठी पुढाकार घेणे गरजेचे-डॉ. सुखदेवे मॅडम यांचे प्रतिपादन

महिलांनी आपले हक्क व अधिकारासाठी पुढाकार घेणे गरजेचे-डॉ. सुखदेवे मॅडम यांचे प्रतिपादन

224

🔹चौगान प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.12 मार्च):-जेव्हा पर्यंत महिलांना पुरुषाबरोबरचे स्थान मिळणार नाही तोपर्यंत महिलाची उन्नती होणे शक्य नाही महिलांना सुद्धा आपले समाजात स्थान निश्चित करायचे असेल तर आपल्या अधिकार व हक्क मिळविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अगोदर महिला ज्या पद्धतीची वागणूक दिली जात होती ती मात्र आजच्या घडीला मिळत नाही तरीपण ती स्वतः सक्षम बनण्यासाठी बरोबर लढाई लढलीच पाहिजे तरच त्यांना उच्च प्रतीचे स्थान मिळेल असे मौलिक विचार चौगाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुखदेवे मॅडम यांनी मांडले.

चौगान प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मानव विकास कॅम्प व आशा वर्कर यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाप्रसंगी त्या विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चौगान ग्रामपंचायतचे सरपंच उमेश धोटे. प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पंडेल साहेब वैद्यकीय अधिकारी आरोग्यवर्धिनी चौगान,डॉक्टर खोब्रागडे मॅडम स्त्री रोग तज्ञ ब्रह्मपुरी, डॉक्टर गणवीर मॅडम बालरोग तज्ञ ब्रह्मपुरी, डॉक्टर भगत मॅडम आरोग्यवर्धिनी केंद्र मेंडकी, राजेंद्र गुणशेट्टीवार साहेब औषध निर्माण अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अशा वर्कर, आरोग्यसेविका ,आरोग्य सेवक, यांना प्रमाणपत्र देऊन गौरवही करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण आरोग्य सेवक आरोग्य सेविका व सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here