Home महाराष्ट्र जिल्हा क्रिडा स्पर्धेत उमटविला क्रांती भुमिचा ठसा-“गोविंदा-गोविंदा”च्या गजरात सहा पदकांची कमाई

जिल्हा क्रिडा स्पर्धेत उमटविला क्रांती भुमिचा ठसा-“गोविंदा-गोविंदा”च्या गजरात सहा पदकांची कमाई

216

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5मार्च):-महाराष्ट्र राज्य नगर विकास विभाग अंतर्गत चंदपूर महानगर पालिकेच्या पुढाकाराने सैनिक शाळेत जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर नगरपरिषदेच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी या महोत्सवात चमकदार कामगीरीने क्रांती भुमिचा ठसा उमटविला. गोंविदा गोंविदाच्या गजरात ३ स्वर्णासह ६ पदकांची केली कमाई.

सैनिकी शाळेत झालेल्या क्रिडा स्पर्धेत कर्णधार गोंविद जक्केवाड यांचे नेतृत्वात वैभव बोन्द्रे,राहुल रणदिवे, प्रदिप रणखांब, शुभम बांगरे, मृणाल गोलकोंडवार यांनी बाजी मारीत चषक तथा स्वर्ण पदक मिळविले. ज्यात सर्वोत्तम शुटर म्हणुन गोविंद जक्केवाड व वैभव बोंद्रे यांना गौरवण्यात आले.गोंविद जक्केवाड यांनी बॅटमिंटन एकेरी स्पर्धेत स्वर्ण पदक, बुद्धिबळ खेळात आशीष पंदीलवार यांनी स्वर्ण पदक.बॅटमिटन एकेरी स्पर्धेत राहुल रणदिवे यांनी रौप्य पदक, मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड तथा गोंविद जक्केवाड यांनी बॅटमिंटन दुहेरी मिश्र प्रकारात रौप्य पदक तर १०० मिटर दौड स्पर्धेत शुभम बांगरे यांनी काष्य पदक प्राप्त केले.

चिमूर नगर परीषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रत्येक क्रिडा प्रकारात भाग घेऊन तिन स्वर्ण,दोन रौप्य व एक काष्य पदक अशा प्रकारे सहा पदकांची कमाई केली.सांस्कृतीक स्पर्धेत सामुहिक नृत्य स्पर्धेत भाग घेऊन आपले नृत्य कौशल्य दाखवले. प्रत्येक खेळात आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्या करीता चिमूरच्या श्रीहरी बालाजीच्या नावाने गोंविदा गोंविदा चा जयघोष करून माहोल बनविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here