Home महाराष्ट्र गेवराई : घरातूनच सुरु केली गांजा विक्री; १० किलो गांजासह एकजण ताब्यात

गेवराई : घरातूनच सुरु केली गांजा विक्री; १० किलो गांजासह एकजण ताब्यात

186

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.3मार्च):-कुंभारवाडी येथे राहत्या घरातून गांजा विक्री सुरु केल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा मारत एकास ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. दादासाहेब रंगनाथ जाधव ( ३०) असे आरोपीचे नाव आहे.

गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना खबऱ्यामार्फत कुंभारवाडी येथे दादासाहेब जाधव याने घरात गांजाचा साठ केल्याची माहिती मिळाली. यावरून आज सकाळी पोलिसांनी जाधवच्या घरावर छापा मारला. ४८,१४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी आरोपी जाधवला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर, अमोल खटाने, संतोष गाडे,जितेंद्र ओव्हळ, गर्जे,देवडे, परजने, नितीन राठोड, गुजर, यादव यांनी केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here