


✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगाव(दि.2मार्च):-बुलढाणा जिल्ह्यातिल खामगाव जिल्हा सत्र न्यायलयाने दिली मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमांना विस वर्ष सक्त कारावासाची शिक्षा. तदर्थ जिल्हा न्यायधिश 1 तथा सहाय्यक सत्र न्यायधिश श्रीमती पि एस काळे यांनी सुनावली सदर प्रकरणामध्ये प्रत्येकी आरोपीला 15000 रुपये दंड सुनावला. सदर दंड न भरल्यास दोन महिने सादी कैद देण्यात आली.
खामगाव शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दी मध्ये येत असलेल्या भागात दि 10/12/2019 रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपी क्र 1 ज्ञानेश्वर किसन तायडे वय 27 व आरोपी क्र 2 दत्ता श्रीराम साठे वय 36 यांनी चाँकलेटचे अमिष देत सदर मतिमंद असलेल्या अल्पवयिन मुलीवर ओसाड जागेवर नेत दुशकर्म करत अत्याचार केला.
सदर प्रकरणात शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे त्तकालिन ठाणेदार रविद्र देशमुख यांनी तपासाची चक्र फिरवित आरोपींना ताबडतोब अटक भादवी 376 डी, 376/2 दिव्यांग सुरक्षा नुसार तर पाँस्को कायदा सेक्शन 6 अंतर्गत दि. 11/12/2019 घटना घडल्याच्या रात्रीच गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणामध्ये तपासी अधिकारी म्हणुन राहुल जगदाळे तर पैरवी अधिकारी म्हणून राजेश ठाकुर व विशेष सरकारी वकिल प्रशांत लाहुडकार यांनी पिडीतेला न्याय देण्याकरिता मुख्य भुमिका पार पाडली.या दिव्यांग कन्येला तत्काळ न्याय मिळावा या करिता विराट मल्टिपर्पज फाऊन्डेशनच्या वतिने धरणे आंन्दोलन सुध्दा करण्यात आले होते, हे विशेष













